मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला फोन करुन त्रास देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.आरोपीने सारा तेंडुलकरला तब्बल २० फोन कॉल्स केले होते. साराशी लग्न लावून देण्यासाठी तो धमकी द्यायचा तसेच, सारा तेंडुलकरचे अपहरण करण्याची धमकीही आरोपी देत असे.या प्रकरणी सारा तेंडुलकरने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव देबकुमार मैती असल्याची माहिती समोर आली आहे.मुंबई पोलिसांनी आरोपीचा फोन ट्रॅक केला आणि तो पश्चिम बंगालमध्ये असल्याचं कळालं. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या टीमने पश्चिम बंगालमधून अटक केली.आरोपीच्या कुटुंबियांनी केला दावा आरोपी देबकुमार याचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं त्याच्या परिवाराने सांगितलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews